बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दिशाचे फोटो पोस्ट होताच व्हायरल होतात.
दिशाने आता पुन्हा तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहते वेडे झाले. यासोबतच दिशा तिची स्वतःची मेकअप आर्टिस्टही बनली आहे. एका कार्यक्रमासाठी तिनं स्वतःचा मेकअप आणि हेअरस्टाईल केली आहे.
दिशाने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो शेअर केले आहेत. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे.
फोटोंमध्ये दिशानं ब्राऊन क्रॉप टॉप आणि पँट परिधान केला आहे. या ड्रेससह तिनं एक नेकपीस कॅरी केला जो तिच्या लूकमध्ये भर घालतो आहे.
दिशाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या फॅनपेजवर हे फोटो धुमाकूळ घालत आहेत.