सैफची मुलगी ते शाहरुखचा मुलगा, ड्रग्ज प्रकरणात NCB च्या गळाला लागलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींची यादी

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या मुलाला अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) ताब्यात घेतलं आहे. मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खानची (Aryan Khan) एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. या निमित्ताने पाहूया बॉलिवूडमधील सेलिब्रिटी आणि स्टारकिड्स यांची ड्रग्ज कनेक्शनमध्ये गाजलेली प्रकरणं

| Updated on: Oct 03, 2021 | 2:46 PM
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या मुलाला अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) ताब्यात घेतलं आहे. मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खानची (Aryan Khan) एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले असून यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे.

1 / 7
अर्जुन रामपालची मैत्रीण गॅब्रिएलाच्या भावाला एनसीबीने अटक केली होती. गॅब्रिएलाचा भाऊ अगिसिलाओस डिमेट्रिएडस याच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आली होती. अॅगिसिलोसला ड्रग्ज प्रकरणात गोव्यातून अटक करण्यात आली होती. यापूर्वीही एनसीबीने गॅब्रिएलाच्या भावाला बॉलिवूड ड्रग्ज सेवन प्रकरणी दोनदा अटक केली आहे.

2 / 7
नाशिकमधील इगतपुरी येथे रेव्ह पार्टीवर टाकलेल्या छाप्यादरम्यान पोलिसांनी ड्रग्ज घेणाऱ्या लोकांना अटक केली होती. या पार्टीतून सुमारे 22 जणांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये मराठी चित्रपट अभिनेत्री हीना पांचाळ हिचा समावेश होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीतील रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. यामध्ये हीनाशिवाय एका परदेशी महिलेसह 22 जणांना अटक झाली होती. मराठी आणि दक्षिण चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री आणि दोन महिला कोरिओग्राफर यांनाही त्यावेळी बेड्या पडल्या होत्या.

3 / 7
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना अटक केली होती. मुंबईतील त्यांच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. एनसीबीने या दाम्पत्याचे कार्यालय आणि घराची झडती घेतली आणि दोन्ही ठिकाणांहून 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला होता.

4 / 7
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्ज अँगलमध्ये त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती आणि नंतर तिला जामीन मंजूर करण्यात आला होता. तिच्यावर सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोप आहे. रियासोबत तिच्या भावालाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

5 / 7
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींची एनसीबीने चौकशी केली. त्यात दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र, कोणावरही कुठल्याही गैरप्रकाराचा आरोप झाला नव्हता.

6 / 7
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अभिनेता अरमान कोहलीच्या निवासस्थानी छापा टाकत त्याला अटक केली होती. या छाप्यात प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. न्यायालयाने मात्र त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.

7 / 7
Follow us
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.