100 कोटींचा गल्ला जमवणारे बॉलिवूड ‘सुपरस्टार’ कधी काळी ठरलेयत ‘सर्वाधिक फ्लॉप’ देणारे कलाकार!
बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक सिनेमे रिलीज होतात. पण असे नाही की सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतात आणि कमाईच्या बाबतीत विक्रम मोडतात. बड्या कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतात आणि पडतात. बॉलिवूडमध्ये अशी अनेक मोठी नावे आहेत, ज्यांच्या नावावर मोठे ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत. आज आपण अशा कलाकारांबद्दल जाणून घेऊया ज्यांच्या नावावर बॉलिवूडमध्ये सर्वाधिक फ्लॉप चित्रपट देण्याचा विक्रम आहे.
1 / 5
बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक सिनेमे रिलीज होतात. पण असे नाही की सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतात आणि कमाईच्या बाबतीत विक्रम मोडतात. बड्या कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतात आणि पडतात. बॉलिवूडमध्ये अशी अनेक मोठी नावे आहेत, ज्यांच्या नावावर मोठे ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत. आज आपण अशा कलाकारांबद्दल जाणून घेऊया ज्यांच्या नावावर बॉलिवूडमध्ये सर्वाधिक फ्लॉप चित्रपट देण्याचा विक्रम आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण अशा कलाकारांमध्ये इंडस्ट्रीतील तीन बड्या खानांच्या नावाचाही समावेश आहे. या यादीत खान कलाकारांव्यतिरिक्त बॉलिवूडचे दिग्गज कलाकार आहेत.
2 / 5
सलमान खान : या यादीत एक नाव बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचंही आहे. सलमानने आपल्या करिअरमध्ये 139 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या यादीत सलमानचे अनेक हिट चित्रपट असून फ्लॉप चित्रपटांचाही या यादीत त्याचा समावेश आहे. सलमानच्या नावावर 29 पेक्षा जास्त फ्लॉप चित्रपट आहेत.
3 / 5
अजय देवगण : अजय देवगण हे एक मोठे नाव आहे ज्याने 90 च्या दशकापासून आपल्या चित्रपटांमधून लोकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 131 हून अधिक चित्रपट केले आहेत. यामध्ये सिंघम, गोलमाल, तान्हाजी यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे. मात्र, आतापर्यंत 28 फ्लॉप चित्रपट देण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
4 / 5
शाहरुख खान : शाहरुखला बॉलिवूडमध्ये किंग खान म्हटले जाते. शाहरुखने आतापर्यंत 108 हून अधिक चित्रपट केले आहेत. शाहरुख हा एकमेव स्टार आहे, ज्याने बॅक टू बॅक 10 हिट चित्रपट दिले आहेत. पण यासोबतच शाहरुख खानच्या नावावर 21 हून अधिक फ्लॉप चित्रपटांची नोंद आहे.
5 / 5
आमिर खान : बॉलिवूडमध्ये आमिरला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की तो त्याच्या चित्रपटांवर अतिशय मेहनतीने काम करतो. याच कारणामुळे बॉलिवूडमधील सर्वात जास्त हिट कलाकारांमध्ये त्याचे नाव आहे. ‘दंगल’ असो वा ‘गजनी’ त्यांचे अनेक चित्रपट हिट ठरले आहेत. पण यासोबतच फ्लॉप सिनेमे देण्यातही त्याचे नाव सामील आहे. आमिरने आपल्या कारकिर्दीत 17 हून अधिक फ्लॉप चित्रपट दिले आहेत.