सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. चाहत्यांनाही दोघांची जोडी खूप आवडली होती, पण आता या दोघांचेही ब्रेकअप झाले आहे. अलीकडेच दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. दरम्यान, अभिनेत्रीने सोशल मीडियावर या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सुष्मिताने रोहमनसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, आम्ही मित्र म्हणून सुरुवात केली आणि आम्ही मित्रच राहिलो. नातं खूप जुनं होतं...प्रेम कायम राहील. यासोबत सुष्मिताने नो मोअर स्पेक्युलेशन, जगा आणि जगू द्या असा हॅशटॅग लिहिला.
रोहमन शॉल/सुष्मिता सेन
सुष्मिता आणि रोहमन 2018 सालापासून एकमेकांना डेट करू लागले होते. दोघेही एकमेकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक आधार देत असत. रोहमन सुष्मिताच्या मुली आणि तिच्या कुटुंबाच्याही खूप जवळचा होता.
याआधी एका मुलाखतीदरम्यान सुष्मिताने सांगितले होते की, जेव्हा दोघांचे नाते सुरु झाले तेव्हा रोहमन तिचे वय तिच्यापासून लपवायचा. दोघांमध्ये 15 वर्षांचे अंतर होते. तथापि सुश्मिताला याबाबत कोणतीही अडचण नव्हती. दोघांमध्ये वयाचे अंतर कधीच आले नाही. पण आता दोघेही एकत्र नाहीत. सुष्मिताने ब्रेकअपचे कारणही सांगितलेले नाही.