हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा लग्न सोहळा राॅयल पध्दतीने पुण्यात पार पडलाय. या लग्न सोहळ्याचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लग्न झाल्यानंतर हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचे रिसेप्शनही धुमधडाक्यात पार पडलंय. या रिसेप्शनमध्ये दोघांचाही लूक राॅयल होता.
या रिसेप्शन सोहळ्यात अनेक मराठी कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. रिसेप्शनमधील फोटो अक्षया देवधर हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या रिसेप्शन सोहळ्यात हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या आई-वडिलांनी देखील हजेरी लावली होती.
जून 2022 मध्ये हार्दिक आणि अक्षया यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर चाहते यांच्या लग्नाची वाट पाहात होते.