रेमो डिसूजाचा जन्म 2 एप्रिल 1972 ला बंगळुरुमध्ये झाला. त्याचं शिक्षण मात्र गुजरातमधल्या जामनगरमध्ये झालं. रेमो डिसूजाचं खरं नाव रमेश यादव आहे. त्याला डान्सचं इतकं वेड होतं की तो मधेच अभ्यास सोडून मुंबईला आला. मुंबईत आल्यानंतर त्याने आपलं नाव बदलून रेमो केलं.
रेमोची परिस्थिती सुरूवातीला फार हालाकिची. त्याला दोनवेळचं अन्न मिळवण्यासाठीही खूप कष्ट करावे लागत होते. पण आज तो करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे.
रेमोला बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा ओळख मिळाली ती आमिर खानच्या 'रंगीला' चित्रपटात नृत्यातून. यानंतर त्याने प्रसिद्ध बॉलिवूड गायक सोनू निगमचा 'दीवाना' अल्बम कोरिओग्राफ केला. हा अल्बम सुपरहिट ठरला. यानंतर रेमोने कधीच मागे वळून पाहिलंच नाही.
आज रेमो डिसूझाकडे करोडोंची संपत्ती आहे एका अहवालानुसार, त्याच्याकडे 58 कोटींच्या आसपास संपत्ती आहे. 2013 मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या 'ABCD' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केलं होतं. यानंतर 'ABCD 2' ही त्याने दिग्दर्शित केलं आणि या चित्रपटानेही चांगली कमाई केली.
रेमो डिसूझाने त्याच्या स्ट्रगलच्या काळातच त्याने लिझेलशी लग्न केलं. रेमो आणि लिझेलची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. या दोघांनी एकमेकांशी तीनदा लग्न केलं आहे. 2019 मध्ये, त्याने लग्नाच्या 20 व्या वाढदिवसानिमित्ता ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार तिसऱ्यांदा लग्न केलं. रेमो आणि लिझेल यांना ध्रुव आणि गॅब्रिएल ही दोन मुले आहेत.