बिग बॉस फेम अभिनेत्री गौहर खान आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर जैद दरबार सध्या सोशल मीडियावर चांगलेच कपल गोल्स देत आहेत.
आता जैद आणि गौहरनं सोशल मीडियावर काही नवे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये दोघांची केमेस्ट्री दिसून येत आहे. ‘He’s got my back … ??’ असं कॅप्शन देत गौहरनं हे फोटो शेअर केले आहेत.
गौहर आणि जैद नेहमीच सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असतात. त्यांचे हे फोटोसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
दोघांचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.