बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर शहनाज गिल बर्यापैकी लोकप्रिय झाली आहे. शहनाजची फॅन फॉलोइंग वेगानं वाढत आहे.
एवढंच नाही तर शहनाजनं तिचं जबरदस्त परिवर्तनही केलं आहे. आता शहनाज आधीपेक्षा प्रचंड ग्लॅमरस बनली आहे.
यासोबतच शहनाजनं तिचं वजनही कमी केलं आहे. शहनाजच्या लोकप्रियतेचा यापेक्षा अधिक पुरावा काय असेल की बॉलिवूडचे लोकप्रिय फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी तिचे दोनदा फोटोशूट केले आहे.
बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींचे फोटोशूट करणार्या डब्बूनं अलीकडेच पुन्हा शहनाजचा फोटोशूट केला असून यात ती खूपच हॉट दिसत आहे.
शहनाज लवकरच दिलजीत दोसांझसोबत हौसला रख या चित्रपटात दिसणार आहे. दोघांनाही एकत्र बघायला चाहते खूप उत्साही आहेत.