शाहरुख खान याच्यावर फिदा झाली दीपिका पादुकोण, थेट कमेंट करत म्हणाली…
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या जोडीने पठाण चित्रपटामध्ये धमाल केली. विशेष म्हणजे प्रेक्षकांनी या जोडीला खूप प्रेम दिले. पठाण चित्रपटाने रेकाॅर्ड ब्रेक अशी कामगिरी केलीये. पठाण चित्रपटाने कमाईमध्ये बाहुबली चित्रपटाला मागे टाकून मोठा रेकाॅर्ड तयार केलाय.
Follow us
दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांचा पठाण हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. या चित्रपटाने तूफान अशी कामगिरी बाॅक्स आॅफिसवर केलीये. चाहत्यांना शाहरुख खान आणि दीपिकाची जोडी प्रचंड आवडलीये.
शाहरुख खान याने पठाण चित्रपटानंतर लगेचच डंकी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता सध्या शाहरुख खान हा त्याच्या जवान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये शाहरुख खान हा दिसला.
नीता मुकेश अंबानी यांच्या सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनाला शाहरुख खान याने हजेरी लावली होती. शाहरुख खान या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या अगोदर त्याच्या स्टायलिस्ट शालीना नाथानीने सोशल मीडियावर त्याच्या लूकचे काही फोटो शेअर केले.
शाहरुख खान याचे हे फोटो पाहून दीपिका पादुकोण फिदा झाली आणि फोटोवर कमेंट करण्यापासून स्वत: ला रोखू शकली नाही. डेड लिहून लवचे इमोजी हे शालीना नाथानीने शाहरुख खान याचे फोटो शेअर करताना कॅप्शन दिले.
शाहरुख खान याच्या या फोटोवर कमेंट करत दीपिका पादुकोण हिने लिहिले की, मी पण…आता दीपिका पादुकोण हिने केलेली कमेंट पाहून चर्चा रंगताना दिसत आहेत. म्हणजे शाहरुख खान याच्या नव्या लूकवर दीपिका पादुकोण फिदा झाली.