नारळ, सुपारीच्या बागेसह दोन बंगल्यांची खरेदी; दीपिका-रणवीर सिंग अलिबागकर होणार?

दीपिका आणि रणवीरने आलिबागमध्ये खरेदी केलेल्या या जागेत दोन आलिशान बंगले असून, नारळ आणि सुपारीच्या तयार बागा देखील आहेत. या जागेच्या नोंदणीसाठी रणवीर आणि दीपिकाने नुकतीच अलिबागमध्ये हजेरी लावली होती. (Deepika Padukone- Ranveer Singh bought property, including two bungalows and a coconut orchard!)

| Updated on: Sep 14, 2021 | 6:57 PM
बॉलिवूडची बहुचर्चित जोडी अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांनी नुकतीच महागडी शॉपिंग केली आहे. रणवीर आणि दीपिकाने मुंबईपासून जवळच असलेल्या अलिबागमध्ये तब्बल 90 गुंठे जागा खरेदी केली आहे. अलिबागमधील मापगाव या भागात त्यांनी ही जागा जवळपास 22 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. या जगेच्यक़ रजिस्ट्रेशनसाठी या जोडीने नुकतीच अलिबागच्या रजिस्ट्रार कार्यालयात हजेरी लावली होती.

1 / 6
दीपिका आणि रणवीरने आलिबागमध्ये खरेदी केलेल्या या जागेत दोन आलिशान बंगले असून, नारळ आणि सुपारीच्या तयार बागा देखील आहेत. या जागेच्या नोंदणीसाठी रणवीर आणि दीपिकाने नुकतीच अलिबागमध्ये हजेरी लावली होती. यावेली आपल्या लाडक्या जोडीची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते जमा झाले होते.

2 / 6
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंहची (Ranveer Singh) जोडी चाहत्यांमध्ये खूप पसंत केली जात आहे. रणवीर आणि दीपिका हे बॉलिवूडमधील सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक मानले जातात. हे पती-पत्नी नेहमीच एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर लग्न केलं.

3 / 6
दीपिकाने 2018 मध्ये इटलीच्या मोकामा लेक येथे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्न केले. रणवीर अनेक वेळा माध्यमांच्या समोर, स्क्रीनवर दीपिकावरील त्याचं प्रेम व्यक्त करताना दिसला आहे. राजस्थानमधील रणथंभोर पॅलेसमध्ये दीपिका आणि रणवीरने नवीन वर्षाचे स्वागत केले. दीपवीरची ही जोडी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लाडक्या जोडप्यांमध्ये मोजली जाते.

4 / 6
रणवीर आणि दीपिकाने ‘रामलीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. रामलीलाच्या सेटवर रणवीर आणि दीपिकाची जवळीक वाढली होती. दोघांनी रामलीलाच्या सेटवरच एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. या चित्रपटात दोघांमधील जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. त्यानंतर दोघांच्या लिंकअपची बातमी पुढे येऊ लागली.

5 / 6
रणवीरने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, दीपिकाला सहा महिने डेट केल्यानंतरच तिला लग्नाबाबत विचारलं होतं. रणवीर म्हणाला की, दीपिकाला लिली (Lily Flower) खूप आवडते. दीपिकासाठी फुले खरेदी करण्यासाठी माझे खूप पैसे खर्च झाले आहेत. दीपिकापेक्षा चांगली जोडीदार मला मिळाली नसती. दीपिकामुळेच माझं करिअर इतकं यशस्वी झालं आहे. दीपिका आणि रणवीर व्यतिरिक्त अलिबागमध्ये शाहरुख खान आणि गौरीची मालमत्ता आहे. अलिबाग हे महाराष्ट्रातील एक अतिशय सुंदर ठिकाण आहे, जेथे कलाकार सुट्ट्या किंवा विशेष कार्यक्रमांचं आयोजन करत असतात.

6 / 6
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.