‘गेहराईं’च्या प्रमोशमसाठी दिपीकाचा हॉट शॉट लूक, ब्लॅक फूल गाऊनमध्ये झाली हायलाइट
गेहराईयॉं चित्रपट प्रदर्शीत होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर देखील दीपिका पदुकोन आपल्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दीपिका आज मुंबईतील हॉटेल सीझन्समध्ये आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आली होती. यावेळी दीपिकाच्या लूकची चांगलीच चर्चा झाली.
1 / 5
अभिनेत्री दीपिका पदुकोनचा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पहिला वहिला चित्रपट गेहराईयॉं 11 फेब्रुवारी रोजी Amazon prime वर प्रदर्शित झाला. गेहराईयॉं चित्रपटाच्या ट्रेलरला दीपिकाच्या चाहात्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. ट्रेलरचा प्रतिसाद पाहून हा चित्रपट धुमाकूळ घालणार असे वाटत होते. मात्र प्रत्येक्षात चित्रपटाला चाहत्यांकडून समिश्र प्रतिसाद मिळत आहे.
2 / 5
गेहराईयॉं चित्रपट प्रदर्शीत होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर देखील दीपिका पदुकोन आपल्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दीपिका आज मुंबईतील हॉटेल सीझन्समध्ये आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आली होती. यावेळी दीपिकाच्या लूकची चांगलीच चर्चा झाली.
3 / 5
चित्रपटाच्या प्रमोशसाठी वरळीमध्ये आलेल्या दीपिकाचे फोटो व्हायरल झाले आहे. या फोटोनमध्ये तिचा हॉट शॉट लूकची झलक तिच्या चहात्यांना पहायला मिळते आहे. दीपिकाने यावेळी ब्लॅक अँण्ड व्हाईट कलरचा फूल गाऊन घातला होता.
4 / 5
या चित्रपटात दीपिका पदुकोन, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. याच्यासोबतच रजत कपूर, आणि नसिरूद्दीन शाह यांच्या देखील भूमिका आहेत. या चित्रपटात नात्यांची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. दोघी बहिणी आणि त्यांचं एकमेकींच्या भोवती फिरणारं ‘लव्ह लाईफ’ अशी या सिनेमाची थोडक्यात गोष्ट सांगता येईल.
5 / 5
हा चित्रपट 11 फेब्रुवारी रोजी Amazon prime वर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला चहात्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. त्यावरून असे वाटत होते की हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालणार, मात्र सध्या तरी या चित्रपटाताला समिश्र प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.