‘देवमाणूस’ या मालिकेत ‘मंजुळा’ ही भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्रतीक्षा जाधव सध्या खूप चर्चेत आहे.
सध्या नवरात्री हा सण जोशात साजरा केला जात आहे. या दिवसांत नऊ रंगांना विशेष स्थानं दिलं जातं. सगळ्या स्त्रिया या दिवसांत प्रत्येक दिवशीच्या रंगानुसार पेहराव परिधान करतात.
आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. आजचा रंग ‘हिरवा’ आहे. या ट्रेंडची भुरळ अभिनेत्रीना नाही पडली तर नवलच! अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिने देखील या ट्रेंडला फॉलो करत खास फोटोशूट केलं आहे.
हिरवीकंच साडी, नक्त नथ आणि दागिन्यांच्या साजाने अभिनेत्रीचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. पारंपारिक वेशात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हीच हे सुंदर देखणं रूप कॅमेरात कैद केलंय छायाचित्रकार स्वप्नील रास्ते यांनी!