अबोध ते कलंक पर्यंत अशा हटके चित्रपटांच्या माध्यमातून धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षितनं चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.
माधुरी दीक्षित वयाच्या 54 व्या वर्षीही चाहत्यांच्या मनावर राज्य करते. ती आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावते.
माधुरी तिच्या अभिनयाबरोबरच नृत्यासाठीही सर्वांमध्ये प्रसिद्ध आहे.
आता माधुरी अभिनय तसेच नृत्य, जज इत्यादीद्वारे चाहत्यांशी संवाद साधते. माधुरी नेहमीच चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते.