सोनम कपूरचं लंडन स्थित आलिशान घर, इनसाईड फोटो इंटररनेटवर चर्चेत, तुम्ही पाहिलेत का?
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिचा लूक चाहत्यांना नेहमीच पसंत पडतो. सोनम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतीच तिने चाहत्यांना तिच्या लंडनच्या घराची एक झलक दाखवली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिचा लूक चाहत्यांना नेहमीच पसंत पडतो. सोनम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतीच तिने चाहत्यांना तिच्या लंडनच्या घराची एक झलक दाखवली आहे. हे फोटो पाहून तुम्हाला राजघराण्याची अनुभूती येणार आहे.
Follow us

सोनमने तिच्या घराचे फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनमचे घर पाहून तुम्हाला राजवाड्यांची आठवण येईल.
सोनमने तिच्या घराचा प्रत्येक कोपरा, बेडरूमपासून बाथरूमपर्यंत अतिशय सुंदर पद्धतीने सजवला आहे. तिने सांगितले की, जेव्हा ती पहिल्यांदा या घरात आली, तेव्हा तिला हे घर आपलंसं वाटलं. हे फार मोठे घर नाही, पण त्यांनी ते अतिशय सुंदर सजवले आहे.
सोनमच्या घराचे दरवाजेही शाही लूक देतात.
सोनमचे स्नानगृह देखील पूर्णपणे शाही आहे. आरसा आणि इतर गोष्टी त्यात सोनेरी रंगाच्या आहेत. तसेच निळ्या रंगाची पोत अतिशय सुंदर दिसतो.
सोनमने तिच्या बेडरूमची झलकही चाहत्यांना दाखवली आहे. याचा एनशंट लूक तुमचे मन जिंकेल.
सोनमच्या घराची लिव्हिंग रूमही शाही आहे. त्यात तिने लाल रंगाचा मखमली सोफा ठेवला आहे. जो लिव्हिंग रूमचे सौंदर्य आणखी वाढवत आहे.
सोनमच्या घराची ही छायाचित्रे सोशल मीडियावर खूप पसंत केली जात आहेत.