बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कायमच चर्चेत असते. मलायका आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमधील फोटो नेहमीच शेअर करते.
काही दिवसांपूर्वीच मलायका अर्जुन कपूरसोबत मुंबईतील एका हाॅटेल बाहेर स्पाॅट झाली होती. यावेळी मलायकाचा लूक सुंदर दिसत होता.
मलायका आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान हा लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. करण जोहर यासाठी अरहानला मदत करणार आहे.
नुकताच मलायकाने नवे फोटोशूट केले आहे. मलायकाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून यामध्ये मलायकाचा एकदम सुंदर लूक दिसत आहे.
या फोटोशूटमध्ये मलायकाने पांढऱ्या डिझाईनचा टॉप आणि ब्लॅक फिटिंग पॅन्ट घातलेली दिसत आहे. हा मलायकाचा लूक चाहत्यांना आवडला आहे.