'बिग बॉस मराठी ३'चे स्पर्धक पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. 'पावनखिंड' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी हे कलाकार एकत्र आले आहेत.
अक्षय वाघमारे, मीनल शाह, गायत्री दातार आणि जय दुधाणे हे कलाकार 'पावनखिंड' हा चित्रपट पाहण्यासाठी एकत्र आले.
या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
पावनखिंड या चित्रपटात अक्षय वाघमारेनं महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
काल बिग बॉस फ्रेंड्ससोबत पावनखिंड चित्रपट बघितला अणि मजा आली, असं कॅप्शन अक्षयने या फोटोंना दिलं आहे.
बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन चांगलाच गाजला होता. या सिझनमधील प्रत्येक स्पर्धकाने आपली छाप सोडली होती.
जय दुधाणे आणि गायत्री दातार यांची बिग बॉसच्या घरात चांगली मैत्री झाली.