बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे बरेच कलाकार आहेत जे अतिशय शानदार जीवन जगतात आणि ते भरपूर पैसा कमावतात तेव्हा ते मालमत्ता खरेदी करण्यासाठी त्याचा वापर करतात. अशा परिस्थितीत जेव्हा मालमत्ता खरेदीवर विशेष सवलत असते, तेव्हा ते कसे मागे राहतील. महाराष्ट्र सरकारची मुद्रांक शुल्क सवलत योजना तूर्तास संपली असली, तरी मालमत्ता खरेदी करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि सध्या अनेक चित्रपट कलाकारांनी त्यात गुंतवणूक केल्याचं कळतं आहे. मालमत्ता आणि गृहनिर्माण क्षेत्रातील मंदी भरून काढण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्क 5 टक्क्यांवरून 2 टक्क्यांपर्यंत कमी केला होता. जानेवारी 2021 ते 31 मार्च 2021 पर्यंत मालमत्तेच्या करार मूल्यावर केवळ 3 टक्के मुद्रांक शुल्क कर वसूल केला गेला. यामुळे बॉलिवूड स्टार्स आकर्षित झाले त्यांनी सरकारनं दिलेल्या शिथिलतेचा पुरेपूर लाभ घेतला आणि त्यांचे पैसे लक्झरी आणि आलिशान घरांमध्ये गुंतवले. मेगास्टार अमिताभ बच्चन व्यतिरिक्त, अनेक अभिनेत्री देखील यात सामील आहेत, ज्यांनी या काळात मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण केली. ही संधी गमावू नये म्हणून अनेक कलाकारांनी गृहकर्जही घेतलं.