अमिताभ बच्चनपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत, बॉलिवूडकर सफर करतात स्वतःच्या मालकीच्या विमानाने!
बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स कोट्यवधींच्या मालमत्तेचे मालक आहेत. याच कारणामुळे हे सर्व स्टार्स त्यांच्या आलिशान जीवनशैलीमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहतात. प्रत्येक स्टारला स्वतःचा काहीना काही छंद असतो. काही सेलिब्रिटींना महागडे शूज घालण्याची आवड असते, तर काही अभिनेत्री त्यांच्या महागड्या पर्समुळे प्रसिद्धीच्या झोतात येतात.
बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स कोट्यवधींच्या मालमत्तेचे मालक आहेत. याच कारणामुळे हे सर्व स्टार्स त्यांच्या आलिशान जीवनशैलीमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहतात. प्रत्येक स्टारला स्वतःचा काहीना काही छंद असतो. काही सेलिब्रिटींना महागडे शूज घालण्याची आवड असते, तर काही अभिनेत्री त्यांच्या महागड्या पर्समुळे प्रसिद्धीच्या झोतात येतात. एवढेच नाही तर बॉलिवूड स्टार्सचे स्वतःचे गॅरेजेस देखील आहेत, ज्यात जगातील महागड्या वाहनांचा समावेश आहे. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांचे स्वतःचे चार्टर्ड प्लेन आहे. तर, आम्ही तुम्हाला अशाच काही प्रसिद्ध स्टार्सबद्दल सांगणार आहोत, जे त्यांच्या वैयक्तिक चार्टर्ड प्लेनने प्रवास करतात.
Follow us

अभिनेता अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमध्ये अनेक नावे दिली गेली आहेत. काही लोक त्यांना मेगा स्टार म्हणतात, तर काही त्यांना बॉलिवूडचे महानायक म्हणतात. अमिताभ बच्चन यांना अतिशय आलिशान जीवनशैली जगणे आवडते. अभिनेत्याकडे एक खाजगी जेट आहे, ज्याचा वापर ते आपल्या कुटुंबासह प्रवास करण्यासाठी करतात.
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानकडेही खासगी जेट आहे. आपल्या सहकाऱ्यांसोबत तो अनेकदा या जेटमध्ये प्रवास करताना दिसतो. शाहरुख त्याच्या चित्रपटांच्या शूटिंग किंवा प्रमोशन दरम्यान त्याचा वापर करतो.
अक्षय कुमार बॉलिवूडचा खिलाडी आहे, ज्याने या उद्योगाला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनेते नेहमीच त्यांच्या सुंदर बंगल्यांमुळे चर्चेत असतो. पण त्याचे खाजगी विमानही कमी लक्झरी नाही. यातून अक्षय आपल्या कुटुंबासह सुट्टीच्या दिवशी फिरायला जातो.
अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि त्यांची सून ऐश्वर्या राय यांच्याकडेही त्यांचे स्वतःचे खासगी जेट आहे. दोघेही लग्नादरम्यान एका खाजगी विमानात दिसले होते. बच्चन कुटुंबात दोन खाजगी विमान आहेत हे खरोखरच आश्चर्यकारक आहे.
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता ग्लोबल आयकॉन बनली आहे. तिच्या अभिनयाबरोबरच अभिनेत्री तिच्या जीवनशैलीमुळेही चर्चेत आहे. प्रियंका बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही सक्रिय आहे. यामुळे, तिला खूप प्रवास करावा लागतो, म्हणून तिने स्वतःसाठी एक खासगी जेट खरेदी केले आहे.