
बॉलिवूड स्टार्सच्या मुली अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतात. सारा अली खानपासून जान्हवी कपूरपर्यंत त्यांच्या फोटोशूट्स आणि चित्रपट असतात त्यामुळे त्या चर्चेत येत असतात. मात्र असे काही स्टार किड्स आहेत जे बॉलिवूडपासून लांब आहेत, मात्र तरीही वेळोवेळी चर्चेत येत असतात.

आलिया कश्यप : दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप, तिच्या रिलेशनशिपविषयी सतत बातम्यांमध्ये येत असते. ती शेन ग्रेगोअरला डेट करत आहे. नुकतंच आलिया कश्यपनं फादर डेच्या दिवशी वडील अनुरागसोबत व्हिडीओ शेअर केला तेव्हा ती चर्चेत आली. या व्हिडीओमध्ये आलियानं अनुरागला लैंगिक संबंध आणि लग्नासारख्या विषयांवर बरेच प्रश्न विचारले होते, ज्याला अनुरागनं उत्तर दिलं.

नव्या नवेली नंदा : अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन यांची मुलगी नव्या नवेली नंदा सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव असते. ती सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत शेअर करते. नुकतंच नव्या चर्चेत आली कारण तिनं इंडियन आयडॉलच्या एका स्पर्धकाविषयी पोस्ट केली होती. स्पर्धक सवाई भट्ट शोच्या बाहेर होता. त्याला काढून टाकल्यामुळे नव्या खूप वाईट वाटलं होतं.

सुहाना खान: बॉलिवूडमध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खानच्या एन्ट्रीबद्दल अनेकदा बातम्या येत असतात. सध्या ती तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहे. तिचे ग्लॅमरस फोटो आणि डान्स व्हिडीओंमुळे सुहाना खान चर्चेत असते.

कृष्णा श्रॉफ : जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ फिटनेस फ्रिक आहे. तिचे बिकिनीवरचे फोटो व्हायरल होतच असतात. तिचं नातं आणि ब्रेकअपमुळे कृष्णा चांगलीच चर्चेत होती.

त्रिशाला दत्त : संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त न्यूयॉर्कमध्ये राहत आहे. त्रिशालाच्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. त्रिशालाचे संबंधही चर्चेत होते. तिच्या प्रियकराचा मृत्यू झाला आहे. ती अनेकदा तिच्या प्रियकराविषयी पोस्ट शेअर करत असते. फादर्स डेलाही त्रिशलानं संजय दत्तसोबत एक फोटो शेअर केला होता.

खुशी कपूर : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरनं इंडस्ट्रीमध्ये प्रवेश घेतला आहे. ‘धडक’ या चित्रपटाद्वारे तिनं पदार्पण केलं. त्याचवेळी श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर सोशल मीडियावर अॅक्टिव आहे. तिचा ग्लॅमरस अंदाज व्हायरल होत राहतो.