कुणी निंदा, कुणी वंदा, आम्हीच होतो चर्चेत यंदा! पाहा सरत्या वर्षात कोणत्या कारणामुळे बॉलिवूडकर चर्चेत…

कोरोना, लॉकडाऊन आणि अनलॉकनंतर आता 2021 हे वर्ष आपला निरोप घेत आहे. जवळपास अनेकांचं हे संपूर्ण वर्ष घरातच गेलं. वर्ष सरत असताना काहीशी मोकळीक मिळाल्याने अनेकांनी फिरण्याचा आणि आपल्या आवडत्या गोष्टी करण्याचा आनंद घेतला. या वर्षात कोरोनाबरोबरच आणखी अनेक गोष्टी चर्चेत राहिल्या. तर, काही कलाकार देखील वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिले.

| Updated on: Dec 23, 2021 | 1:55 PM

1 / 10
यंदाच्या वर्षी सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या कलाकारांच्या यादीत ‘पंगा क्वीन’ कंगना रनौत हिचे नाव सर्वात वर आहे. अर्थात कंगना एका वादामुळे नाहीतर, अनेक कारणांमुळे चर्चेत होती. तिच्या मुंबईतील ऑफिसमधील अनधिकृत बांधकामाचे तोडकाम, शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या शीखसमुदायावर टीका यामुळे सतत कोर्टवारी करणारी यंदा भरपूर चर्चेत होती.

2 / 10
वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात चर्चेत आलेलं नाव म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ. नुकताच, काही दिवसांपूर्वी कतरिना कैफने संसार थाटला आहे. ‘उरी’ फेम अभिनेता विकी कौशल याच्या प्रेमात पडल्यानंतर कतरिनाने लगोलग लग्नाचा निर्णय घेतला. कतरिनाचा हा विवाह सोहळा इतका खासगी होता की, त्यात आमंत्रित लोकांना चक्क फोन वापरण्याचीही परवानगी नव्हती.

3 / 10
‘उरी’, ‘सरदार उधम’, ‘मसान’ सारखे सुपरहिट चित्रपट देणार अभिनेता विकी कौशल देखील यंदा प्रचंड चर्चेत होता. ‘सरदार उधम’ मधील त्याची कामगिरी जगभरात वाखाणणली गेली. तर, दुसरं आणि म्हत्त्वाचं कारण म्हणजे अभिनेत्याचं लग्न. कतरिना कैफशी लग्नगाठ बांधत विकी आता संसारात रमला आहे.

4 / 10
सरत्या वर्षात एक नाव जे प्रचंड गाजलं आणि चर्चिलं गेलं ते म्हणजे समंथा रुथ प्रभू. साऊथ क्वीन समंथाने पती अभिनेता नागा चैतन्यशी घटस्फोट घेत अवघ्या मनोरंजन विश्वाला मोठा धक्का दिला. वर्षाच्या सुरुवातीपासून तिच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. मात्र, स्वतः सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी आपल्या घटस्फोटाची बातमी जाहीर केली. याबरोबरच ‘पुष्पा’ या चित्रपटात अभिनेत्रीने पहिल्यांदाच चक्क डान्स नंबर केला.

5 / 10
कॉमेडीयन कपिल शर्मा देखील यंदा बराच चर्चेत होता. एकीकडे त्याच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले. तर, दुसरीकडे त्याचा बंद पडलेला ‘द कपिल शर्मा शो’ हा पुन्हा एकदा नव्या संकल्पाने सुरु झाला. वाढलेले वजन कमी केल्यामुळे देखील कपिल शर्मा यंदा चर्चेत होता.

6 / 10
दीपिका पदुकोण यंदा चर्चेत असण्याचं कारण जरा वेगळंच होतं. यंदा अभिनेत्रीचा एकही चित्रपट रिलीज झाला नाही. मात्र, बॉलिवूड ड्रग्ज केस प्रकरणात दीपिकाचं नाव समोर आल्याने,, तिच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली. या दरम्यान अभिनेत्रीला NCBच्या चौकशीला देखील सामोरे जावे लागले होते.

7 / 10
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरचे बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचे कनेक्शनही समोर येत आहे. यात अग्रक्रमी असणारे नाव म्हणजे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस. या महाठकाने अभिनेत्रीला महागडी गिफ्ट्स देत तिला आपल्या जाळ्यात ओढले होते. तिचे सुकेशसोबतचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आणि ती प्रचंड चर्चेत आली.

8 / 10
बॉलिवूडचा ‘किंग खान’ अर्थात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा यंदाचा ‘मोस्ट सर्च स्टारकीड’ म्हटला तर वावगं ठरणार नाही. क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. इतकचं नव्हे तर, त्याला या प्रकरणात काही काळ तुरुंगाची हवा देखील खावी लागली होती. सध्या आर्यन तुरुंगाबाहेर असला, तरी तो अद्याप या प्रकरणातून सुटलेला नाही.

9 / 10
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक असणारा राज कुंद्रा सरत्या वर्षात प्रचंड चर्चेत राहिला. मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील चित्रपट बनवून ते परदेशात विकल्याने राज कुंद्रा चांगल्याच गोत्यात आलेला. अनेक अभिनेत्रींनी त्याच्यावर आरोप लावले. अश्लील चित्रपट आणि व्हिडीओ प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. जवळपास 2-3 महिने तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर आता राज कुंद्रा जामिनावर बाहेर आला आहे.

10 / 10
Follow us
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.