दुबईमध्ये फिल्मफेअर अवॉर्ड्सचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
फिल्मफेअर अचिव्हर्स नाईट दुबईत आयोजित करण्यात आली होती. या सेलिब्रेशनमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस लूकमध्ये पोहचल्या होत्या.
सनी लिओनीपासून ते नर्गिस फाकरीपर्यंत सर्वांचेच ड्रेस आणि लूक जबरदस्त होता. सनीने यावेळी पेस्टल रंगाचा ड्रेस घातला होता.
या खास पार्टीत बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. रणवीर सिंहपासून शहनाज गिलपर्यंत सर्वचजण पोहचले होते.
वाणी कपूर आणि नर्गिस यांचाही लूक यावेळी बघण्यासारखा होता. गेल्या काही दिवसांपासून नर्गिस चित्रपटात दिसली नाहीये, परंतू तिचा बोल्ड लूक पाहण्यासारखा होता.