Happy Birthday Anupam tripathi | ‘स्क्विड गेम’ मधील अलीच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता नक्की आहे तरी कोण?
ऑक्टोबर 2021 मध्ये स्क्विड गेम ही सिरीज रिलीज झाली. नेटफ्लिक्सवरील ‘स्क्विड गेम’ या वेब सीरिजने जगभरातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. आता जगभरात या सीरिजची चर्चा सुरूये. सीरीजसह यातील कलाकारही खूप चर्चेत आहेत.या सीरीजमधील भारतीय कलाकार अनुपम त्रिपाठी सध्या खूप चर्चेत आहेत.
ऑक्टोबर 2021 मध्ये स्क्विड गेम ही सिरीज रिलीज झाली. नेटफ्लिक्सवरील ‘स्क्विड गेम’ या वेब सीरिजने जगभरातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं.
Follow us
ऑक्टोबर 2021 मध्ये स्क्विड गेम ही सिरीज रिलीज झाली. नेटफ्लिक्सवरील ‘स्क्विड गेम’ या वेब सीरिजने जगभरातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं.
आता जगभरात या सीरिजची चर्चा सुरूये. सीरीजसह यातील कलाकारही खूप चर्चेत आहेत.या सीरीजमधील भारतीय कलाकार अनुपम त्रिपाठी सध्या खूप चर्चेत आहेत.
अनुपम त्रिपाठी यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1988 रोजी देशाच्या राजधानी दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
अनुपम त्रिपाठी एक थिएटर आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी २००६ ते २०२१ पर्यंत थिएटरमध्ये अनेक शोमध्ये काम केले आहे. आपला अभिनय अजून छान करण्यासाठी अनुपम त्रिपाठी यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेशही घ्यायचा होता.
त्यांच्या एका मित्राने कोरिया नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्समध्ये प्रवेशासाठी आर्ट्स मेजर एशियन स्कॉलरशिपबद्दल माहिती दिली.अनुपम त्रिपाठी यांनी परीक्षा दिली आणि ते यशस्वीही झाले. यानंतर अनुपम त्रिपाठी २०१० मध्ये कोरियाला गेले.
स्क्विड गेममध्ये अनुपम त्रिपाठी यांनी पाकिस्तानी व्यक्ती अलीची भूमिका साकारली होती. या वेब सिरीजमुळे अनुपम त्रिपाठी यांना भारतातच नाही तर जगभरात लोकप्रियता मिळाली.अनुपम त्रिपाठी यांनी अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे, मात्र त्यांना खरी ओळख दक्षिण कोरियाच्या स्क्विड गेम या वेब सीरिजमधून मिळाली.
कोरियाला गेल्यानंतर अनुपम त्रिपाठी यांना सुरुवातीला भाषेची अडचण आली, पण २ वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांनाही कोरियन भाषा बोलता आली.
.ग्रॅज्युएशननंतर अनुपम त्रिपाठी यांनी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ओड टू माय फादर , द फोन , लक-की , असुर: द सिटी ऑफ मॅडनेस हार्ट ब्लॅकन , मिस अँड मिसेस कॉप्स सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.