
बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा (Neha Sharma) आज (20 नोव्हेंबर) तिचा 34वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहाचा जन्म 21 नोव्हेंबर 1987 रोजी भागलपूरमध्ये झाला. नेहाने केवळ बॉलिवूडमध्येच नाही, तर साऊथ इंडस्ट्रीतही काम केले आहे. पण नेहाला दोन्ही इंडस्ट्रीत यश मिळू शकले नाही. पण, तुम्हाला माहीत आहे का नेहा शर्माचा राजकारणाशी खास संबंध आहे.

नेहा शर्मा या भागलपूरचे काँग्रेस आमदार अजित शर्मा यांची मुलगी आहे. राजकारणात येण्यापूर्वी अजित हे व्यापारी होते. नेहाने तिच्या वडिलांसाठी खूप प्रचार केला आहे. अजित शर्मा विधानसभा पोटनिवडणुकीला उभे असताना नेहा वडिलांच्या प्रचारासाठी आली होती. नेहाला पाहण्यासाठी हजारो लोक जमले होते.

नेहाच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने साऊथच्या 'चिरुथा' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर नेहाने मोहित सूरीच्या 'क्रुक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती 'तेरी मेरी कहानी', 'क्या सुपर कूल हैं हम', 'यमला पगला दीवाना', 'यंगिस्तान', 'कीर्ती', 'तुम बिन 2'सह अनेक चित्रपटांमध्ये दिसली. पण यापैकी एकही चित्रपट काही विशेष जादू दाखवू शकला नाही.

नेहा शर्माने गतवर्षी सिद्धार्थ शुक्लासोबत एका म्युझिक व्हिडीओ केला होता. हे गाणे चाहत्यांना खूप आवडले. ‘दिल को करार आया’ या गाण्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले होते. यानंतर नेहा काही वेब सीरीजमध्ये दिसली होती.

सध्या नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करत असते. नेहाचे वर्कआउट व्हिडीओ खूप पसंत केले जातात. हे व्हिडीओ पोस्ट होताच व्हायरल होतात. या व्हिडीओंना लाखो व्ह्यूज मिळतात.