Happy Birthday Udit Narayan | नेपाळ इंडस्ट्रीतून करिअरची सुरुवात, आमिर खानच्या एका गाण्याने बदललं उदित नारायण यांचं आयुष्य!
'पेहला नशा पहला खुमार', 'ए मेरे हमसफर' यांसारख्या सुपरहिट गाण्यांचे गायक उदित नारायण (Udit Narayan) आज (1 डिसेंबर) त्यांचा 66वा वाढदिवस साजरा करत आहेत. 90च्या दशकात उदित नारायण यांनी आपल्या गाण्यांनी करोडो लोकांची मने जिंकली होती.
1 / 5
'पेहला नशा पहला खुमार', 'ए मेरे हमसफर' यांसारख्या सुपरहिट गाण्यांचे गायक उदित नारायण (Udit Narayan) आज (1 डिसेंबर) त्यांचा 66वा वाढदिवस साजरा करत आहेत. 90च्या दशकात उदित नारायण यांनी आपल्या गाण्यांनी करोडो लोकांची मने जिंकली होती. उदित नारायण यांचा जन्म 1 डिसेंबर 1955 रोजी सुपौल येथे झाला. उदित नारायण यांनी हिंदीसह तमिळ, बंगाली, भोजपुरी, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
2 / 5
सुपौलमध्ये जन्मलेल्या उदित नारायण यांनी हिंदीतून नाही तर नेपाळी इंडस्ट्रीतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ‘सिंदूर’ या नेपाळी चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. उदित नारायण यांनी नेपाळमधील एका रेडिओ वाहिनीमध्येही काम केले आहे. त्यांनी रेडिओमध्ये कर्मचारी गायक म्हणून काम केले. पण त्याच्या एका गाण्याने त्याचं नशीब बदललं.
3 / 5
10 वर्षे संघर्ष केल्यानंतर उदित नारायण यांचे पहिले सुपरहिट गाणे प्रदर्शित झाले. आमिर खानच्या ‘कयामत से कयामत तक’मधील 'पापा कहते हैं बडा नाम करेगा' हे गाणे होते. या एका गाण्याने उदित नारायणचे आयुष्य बदलून टाकले. या गाण्यासाठी उदित नारायण यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले तसेच कामाच्या अनेक ऑफर्सही येऊ लागल्या.
4 / 5
उदित नारायण त्यांच्या गाण्यांसाठी नेहमीच चर्चेत असत. मात्र, ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत होते. उदित नारायण यांनी दोन लग्न केली आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रंजना नारायण आणि दुसऱ्या पत्नीचे नाव दीपा नारायण आहे. उदित नारायण यांनी पहिले लग्न स्वीकारण्यास नकार दिला होता. पण, नंतर रंजनाने कोर्टात धाव घेतल्यानंतर त्यांनी लग्नाच्या गोष्टीला होकार दिला.
5 / 5
उदित नारायण यांना त्यांची दुसरी पत्नी दीपापासून एक मुलगा आदित्य नारायण देखील आहे. उदित नारायण प्रमाणेच त्यांचा मुलगा आदित्य हा देखील पार्श्वगायक आहे. आदित्यने अनेक सुपरहिट बॉलिवूड गाणी गायली आहेत. उदित नारायण यांना चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. 2009 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.