अभिनेत्री हिना खान तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तिचा प्रत्येक अवतार चाहत्यांची मने जिंकतो. हिना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत राहते. आज हिनाने तिच्या पारंपारिक लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत.
हिनाने सोशल मीडियावर काळ्या आणि लाल रंगाच्या फुलांच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पोस्ट करताच व्हायरल झाले आहेत.
हिनाने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो क्लिक केले आहेत. तिच्या या पोझचे खूप कौतुक केले जात आहे. लाखो लोकांनी तिचे फोटो पसंत केले आहेत.
हिना खानचा लूक अतिशय साधा आहे. तिने मेसी बन बनवला आहे आणि न्यूड मेकअप केला आहे. ज्यामुळे अनेक लोक तिच्या लुकला फॉलो करत आहेत.
इन्स्टाग्रामवर हिना खानला 14 मिलियन लोक फॉलो करतात. इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत ती अनेक मोठ्या अभिनेत्रींशी स्पर्धा करते.