रॅपर आणि गायक हनी सिंह याने आतापर्यंत अनेक हिट गाणे बाॅलिवूडला दिले आहेत. विशेष म्हणजे हनी सिंह याच्याबद्दल युवकांमध्ये मोठे क्रेझ बघायला मिळते. हनी सिंह याचे प्रत्येक गाणे धमाल करते.
पाच ते सहा वर्षांपासून हनी सिंह हा गायब होता. यादरम्यान हनी सिंह याचे एकही गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले नाही. हनी सिंह याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने सतत वाट पाहत होते. शेवटी आता हनी सिंहने पुनरागमन केले.
हनी सिंह हा सध्या त्याच्या गाण्याचे प्रमोशन करताना दिसत आहे. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये हनी सिंह याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. हनी सिंह म्हणाला की, मी गेली 7 वर्ष डिप्रेशनमध्ये होतो.
इतकेच नाही तर मी सात वर्ष टीव्ही बघितली नाही. टीव्ही बघायची मला भिती वाटत होती. इतकेच नाही तर मी 6 वर्ष कोणालाही फोनवर पण बोललो नाही. मला सर्व गोष्टींची भिती वाटत होती.
मला सुरूवातीला तीन वर्ष डाॅक्टर शोधण्यात गेली. मला काय होत आहे हे मलाच माहिती नव्हते. यादरम्यान मी सात डाॅक्टर चेंज केले पण फरक काहीच नव्हता. 2021 मध्ये मला चांगले डाॅक्टर मिळाले आणि सुधारणा झाली.