
रात्रीस खेळ चाले मालिकेतले अण्णा नाईक अर्थात माधव अभ्यंकर आता पुन्हा एकदा फिदा झाले आहेत. मात्र ते यावेळी शेवंतावर नाहीत तर आंबोलीतल्या निसर्ग सौंदर्यावर.

अण्णा नाईक यांनी सहपत्नीक आंबोली घाटाला भेट दिली आणि निसर्गानं उधळण केलेल्या आंबोलीवर ते बेहद्द खुश झाले. आंबोलीत त्यांनी दोन दिवस मुक्काम केलं आंबोलीचा संपूर्ण परिसर ते फिरले.

आंबोलीत ठायी ठायी वाहणाऱ्या धबधब्यांवर अण्णा जाम खुश झाले. अण्णांच्या पत्नीनेही इथल्या निसर्ग सौंदर्याचा आणि अविष्कारांचा मनमुराद आंनद घेतला.

अगदी अण्णांच्या पत्नीनं शेतीत उतरून लावणी सुद्धा लावली. अण्णा आणि त्यांच्या पत्नीला मनमुराद आनंद घेताना पाहून अनेक पर्यटकांनी त्यांच्या सोबत सेल्फी घेण्याची संधी सोडली नाही. अण्णांना आंबोली टुरिजम या संस्थेच्या निर्णय राऊत यांनी संपूर्ण आंबोलीची सैर घडवली ज्यामुळे अण्णा या निसर्ग संपन्न आंबोलीच्या प्रेमात पडले.

अण्णांना आंबोली एवढी भावली की त्यांनी सर्वांना आंबोली पाहण्याचा सल्ला दिला आहे.