हृतिक रोशनचा चित्रपट विक्रम वेधा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मात्र, सध्या हृतिक रोशन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलांय.
हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन लवकरच बाॅलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. नुकताच सोशल मीडियावर पश्मिना रोशनचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोंमध्ये हृतिकच्या बहीणाचा एकदम बोल्ड लूक दिसतोय. हे फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
पश्मिना रोशनने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये हे फोटोशूट केले आहे. पश्मिनाच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटो प्रचंड आवडत असल्याचे दिसत आहे.
पश्मीना लवकरच बाॅलिवूडमधील चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. आता पश्मीना नेमक्या कोणत्या चित्रपटातून पदार्पण करणार हे बघण्यासारखे ठरणार आहे.