
बॉलिवूडची सुंदर दिवा इलियाना डिक्रूझ (Ileana D’cruz) मालदीवच्या व्हेकेशन ट्रीपमधील तिचे सुपर सिझलिंग फोटो सतत शेअर करत आहे. चाहत्यांना इलियानाचे हे फोटो खूप आवडत आहेत.

लाल बिकिनी फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवल्यानंतर आता इलियानाने व्हाइट बिकिनीमधील आणखी एक जबरदस्त फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत, जे पाहून आता चाहते घायाळ झाले आहेत.

इलियानाने मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर पांढऱ्या बिकिनीतील स्वतःचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये इलियाना बिकिनी घालून सनबाथ घेताना आहे. इलियानाच्या या फोटोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दबदबा निर्माण केला आहे, चाहत्यांना तिचा हा बिकिनी फोटो खूपच जबरदस्त वाटत आहे.

याशिवाय इलियानाने तिच्या काही नवीन फोटोंमध्ये तिचा वीकेंडचा मूडही चाहत्यांसोबत शेअर केला आहे. नवीन फोटोंमध्ये अभिनेत्री मालदीवच्या समुद्रात पोहताना दिसत आहे.

बिकिनी घालून समुद्रात पोहताना इलियाना एखाद्या जलपरीपेक्षा कमी दिसत नाही. फोटो शेअर करताना इलियानाने कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘विकेंड मूड’