अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या हटके अदांमुळे चर्चेत आली आहे.
बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस सध्या 'आयफा' (IIFA 2023) पुरस्कार सोहळ्यातील तिच्या लुकमुळे चर्चेत आली आहे.
पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. पुरस्कार सोहळ्यातील अभिनेत्रीचे काही हटके फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर देखील तिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
सोशल मीडियावर जॅकलिन फर्नांडीस कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.