जान्हवी कपूर सध्या खूप व्हेकेशन एन्जॉय करत आहे. काही दिवसांपूर्वी ती सारा अली खानसोबत केदारनाथला गेली होती आणि आता अलीकडे ती बहीण खुशी आणि एका मित्रासोबत फिरत आहे. जान्हवीने या ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जान्हवी कपूरला फिरण्याचा खूप शौक आहे. कामातून मोकळा वेळ मिळताच ती फिरायला जाते.
यादरम्यान ती खूपच बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. जान्हवीने तपकिरी रंगाचा टँक टॉप आणि शॉर्ट्स घातली आहे. ती डेझर्ट राईडचा आनंद लुटताना दिसत आहे.
जान्हवीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवट 'रुही' चित्रपटात दिसली होती. आता ती ‘गुड लक जेरी’ आणि ‘दोस्ताना 2’मध्ये दिसणार आहे.
यावेळी जान्हवीसोबत तिची बहीण खुशी कपूरही आहे. यादरम्यान खुशीने जान्हवीसारखा तपकिरी रंगाचा टँक टॉप आणि काळी शॉर्ट्स घातली आहे.