बोनी कपूरची लेक जान्हवी कपूर ही तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी जान्हवीचा मिली हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, जान्हवीच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.
जान्हवी सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. जान्हवी कपूरची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे.
जान्हवी कपूर हिची बहीण खुशी कपूर ही देखील यंदाच्या वर्षी बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर एकाच चित्रपटामध्ये दिसणार आहेत.
जान्हवी कपूर हिने नुकताच जबरदस्त असे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये जान्हवीचा अत्यंत बोल्ड लूक दिसतोय. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तिने पांढरी साडी घातली आहे.
या फोटोशूटमधील सर्वात स्पेशल गोष्ट म्हणजे तिने हे फोटोशूट पाण्यामध्ये केले आहे. आता जान्हवीच्या या फोटोशूटचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.