जास्मिन भसीन ही टीव्हीमधील फेमस चेहरा आहे. आतापर्यंत जास्मिनने अनेक हीट मालिकांमध्ये महत्वाची भूमिका केलीये. विशेष म्हणजे बिग बाॅसमध्येही जास्मिन सहभागी झाली होती.
सोशल मीडियावर जास्मिन भसीनची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. जास्मिन सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो शेअर करते.
बिग बाॅसमध्ये जास्मिन सहभागी झाल्यानंतर तिचे एक वेगळी रूप प्रेक्षकांना बघायला मिळाले. खतरो के खिलाडीमध्येही जास्मिन सहभागी झाली होती.
महेश भट्टच्या एका चित्रपटामध्ये जास्मिन डेब्यू करणार आहे. यावेळी जास्मिन म्हणाली की, आयुष्यात आपण जी गोष्टी पहिल्यांदा करतो, ती नेहमीच खास असायला हवी.
जस्मिन भसीन हिला स्टार किड्सच्या स्पर्धेशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला, तेंव्हा ती म्हणाली की, जेंव्हा मी बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार होते, तेंव्हा शेवटच्या क्षणी माझी जागा घेतली गेली. आणि मग मी टीव्हीवर आले. म्हणजेच काय तर स्टार किड्समुळे जास्मिनला देखील फटका बसला आहे.