अभिनयाबरोबरच सौंदर्यानं सर्वांना वेड लावणारी काजल अग्रवाल चाहत्यांमध्ये खूप पसंत केली जाते. काजलनं काही महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली.
आता लग्नानंतर काजलनं प्रथमच हरियाली तीजचा विशेष सण साजरा केला आहे. सण साजरा करणाऱ्या चाहत्यांसाठी तिनं फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती कुटुंबासह हरियाली तीज साजरी करताना दिसतेय.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये काजल अग्रवालच्या हातावर मेहंदीही लावण्यात आली आहे. यासोबत ती हिरव्या रंगाचा सलवार सूट परिधान करुन दिसतेय.
तिच्या लूकला खास स्टाईल देण्यासाठी काजलनं लाल गुलाबं लावला आहे. तिने आपल्या अनेक नातेवाईकांसोबतही फोटो शेअर केले.
या सर्व फोटोंमध्ये काजल खूप सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा तिचं वेड लागलं आहे.