हायप्रोफाईल मर्डर केसमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याचं नाव, गडगंज संपत्ती, महागड्या गाड्या आणि बरंच काही
झगमगत्या विश्वात सध्या प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगूदीपा याची चर्चा रंगली आहे. रेणुका स्वामी मर्डर केसमध्ये अभिनेत्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अभिनेत्याच्या पोलीस कोठडीत 20 जूनपर्यंत वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेत्यासोबत गर्लफ्रेंड पवित्रा गौडाही कोठडीत आहे.