करीना कपूर ही तिचा टाॅक शो व्हाट वीमेन वांट याचे नवे सीजन घेऊन आलीये. ज्याचा एक प्रोमो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये कपिल शर्मा देखील दिसतोय.
करीना कपूर हिच्या शोमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे या शोमध्ये तिचा चुलत भाऊ रणबीर कपूर हा देखील आलाय. या व्हिडीओमध्ये करीना कपूर आणि रणबीर कपूर हे करण जोहर याच्याबद्दल बोलताना दिसत आहेत.
करीना कपूर आणि रणबीर कपूर म्हणताना दिसत आहेत की, त्यांची इमेज ही फक्त करण जोहर याच्यामुळे खराब झालीये. मात्र, यामध्ये त्यांनी फक्त करण असे नाव घेतले आहे.
करीना आणि रणबीर यांचे बोलणे ऐकून असा अंदाजा लावला जात आहे की, हे दोघेही करण जोहर याच्याबद्दलच बोलत आहेत. म्हणजेच करीनाच्या या शोमध्ये मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे.
इतकेच नाहीतर या शोमध्ये रणबीर कपूर हा मुलगी राहा हिच्याबद्दल देखील बोलताना दिसत आहे. नुकताच रणबीर कपूर याचा एक चित्रपट रिलीज झालाय आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.