सिनेमाची दुनिया म्हणजे निव्वळ ग्लॅमरच असतं अशातला भाग नाही. तिथं जितका झगमगाट आहे, लखलखाट आहे, तितकंच या क्षेत्राला डाग लागलेल्या घटनाही समोर आलेल्या आहेत. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील लोकंही दाक्षिणात्य सिनेमांबाबत अधिक रस घेऊ लागलेत. दाक्षिणात्य सिनेमे, त्यातील कलाकार, त्यांचं आयुष्य याबाबतच्या गोष्ट, चर्चा चवीन चघळल्या जातात. अशातच दाक्षिणात्य सिनेमाची एक ग्रे शेडही आहे. दाक्षिणात्य सिनेमातील अनेक अभिनेत्री या सेक्स रॅकेटशी संबंधित असल्याचं तपास उघड झालेलंय. त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली. या अभिनेत्रींना वेळप्रसंगी अटकही झाली. अभिनेत्रींची नावं जेव्हा सेक्स रॅकटशी जोडली गेली असल्याचं उघडकीस आलं, तेव्हा तर अनेकांना धक्काच बसला होता. पैसे कमावण्याच्या नादात काही दाक्षिणात्य अभिनेत्रींनी जे केलं त्यांनं या क्षेत्राचा काळा चेहरा समोर आणला होता. अशाच पाच दाक्षिणात्य अभिनेत्रींबाबत जाणून घेणार आहोत.