
दिग्दर्शक करण जोहर याचा 'कॉफी विथ करण' अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. शोचा सातवा सीझन देखील चाहत्यांच्या पसंतीस पडला. शोमध्ये आलेल्या सेलिब्रिटींची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते.

शोमध्ये येणारा प्रत्येक सेलिब्रिटी कॉफीच्या मगमधून कॉफीची मजा घेतो, असं नाही. सेलिब्रिटी या कॉफीच्या कपमधून फक्त कॉफी पीत नाहीत नाही तर, इतर पेय देखील पितात.

कॉफीच्या कपमधून सेलिब्रिटी त्यांच्या आवडीचं पेय पितात. कोल्ड ड्रिंक, ग्रीन टी, ज्यूस किंवा इतर पेय देखील सेलिब्रिटी कॉफीच्या कपमधून पितात. शोमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगतात.

करणच्या शोमध्ये आतापर्यंत अभिनेत्री करीना कपूर, आलिया भट्ट, सारा अली खान, जान्हवी कपूर, प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण अभिनेता रणबीर कपूर, अक्षय कुमार, आदित्य राय कपूर यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.

शोमध्ये करण सेलिब्रिटींना त्यांच्या खासगी आयुष्याती अनेक प्रश्न विचारतो. शिवाय शोमधील रॅपिड फायरची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. करण 'कॉफी विथ करण' प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो.