सिंघम गर्ल काजल अग्रवाल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.
काजल अग्रवालला फॅशनची उत्तम जाण आहे. नुकतंच तिनं सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती बॉस लेडीच्या अवतारात दिसली आहे.
नुकतंच काजल अग्रवालनं एक ग्लॅमरस फोटोशूट केले असून यात ती एक जबरदस्त हॉट पिंक पॅन्टसूटमध्ये दिसत आहे.
काजलने परिधान केलेला हा ड्रेस रिती राहुल शाहनं डिझाइन केला आहे. को-ऑर्डर पिंक ब्लेझर आणि पँट सेटमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
या ब्लेझरवर काजलनं एक बेल्ट कॅरी केला आहे. जो या ड्रेसला आणखी चांगला लूक देत आहे.
काजलनं हा ड्रेस गोल्डन हुप इयररिंग्ज आणि एका घड्याळासोबत पूर्ण केला आहे. याशिवाय आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं केस कर्ल केले आहेत आणि मिनिमल मेकअप, न्यूड लिपस्टिक लावली आहे.
काजल अग्रवालनं 30 ऑक्टोबर 2020 रोजी गौतम किचलूशी लग्न केलं होतं. कोरोनाच्या साथीमुळे हे लग्न कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडलं.