लिसा हेडन काही दिवसांपूर्वीच एका मुलीची आई झाली. तिनं सोशल मीडियावरुन ही माहिती दिली होती.
आता लिसानं मुलीचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हे फोटो तिच्या पतीनं शेअर केले त्यानंतर लीसाने पुन्हा तिच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत.
या फोटोंसह लिसाचा पती डिनो लालवानीनं इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. फोटो शेअर करताना डिनोने लिहिलं, माझ्या मुली.
लिसाच्या प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचं झालं तर ती आतापर्यंत आयेशा, क्वीन, द शॉकिन्स, हाऊसफुल 3 आणि ए दिल है मुश्किल मध्ये दिसली आहे.
लिझाने याआधी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो शेअर केले होते आणि त्यासोबत तिने बेबी शॉवरही घेतला होता.