स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या आलिया भट्टनं आता चाहत्यांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. आलिया अनेकदा तिच्या स्टाईलची जादू चाहत्यांवर पसरवते.
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या आलिया भट्टनं नुकतंच तिचे खास फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
आलियानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एका डोंगराळ परिसरात पोज देताना दिसत आहे.
फोटोंमध्ये आलिया खूप आनंदी दिसत आहे. आलियाची ही स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
फोटो शेअर करताना आलियाने लिहिले आहे की, आपण वाटेत शिकतो, हे करत असताना आपण काही फोटोही काढले पाहिजेत.
आलियाच्या या फोटोवर सेलेब्स खूप कमेंट करत आहेत. रणवीर सिंगनं तिच्या फोटोंवर हार्ट इमोजी कमेंट केली आहे.