Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Man Jhala Bajind मालिकेत बगाड यात्रा; रायाला मिळाला बगाड्याचा मान

झी मराठी वाहिनीवरील 'मन झालं बाजिंद' (Man Jhala Bajind) या लोकप्रिय मालिकेत सातारा-वाई या भागातील प्रसिद्ध बगाड यात्रा (Bagad Yatra) दाखवण्यात येणार आहे. वाई येथील फुलेनगर - शहाबाग येथील अनेक वर्षांची परंपरा असलेले बगाड या मालिकेच्या निमित्ताने सगळ्यांना पाहायला मिळेल.

| Updated on: Mar 24, 2022 | 1:32 PM

1 / 6
साताऱ्यातील बावधनसारखंच बगाड फुलेनगर वाई येथे ही होते. ही यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे कार्य 'मन झालं बाजिंद'च्या कलाकारांनी केले आहे. प्रेक्षकांना मालिकेत ही यात्रा २५ मार्च ते २९ मार्चपर्यंत पहायला मिळेल. प्रेक्षकांनी या मालिकेत नुकतंच पाहिलं की कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी तिला घटस्फोट द्यायचा हा निर्णय रायाने घेतला. त्याचदरम्यान गावाची बगाड यात्रा जवळ आली आहे.

2 / 6
देवीला नवस करायचा आणि बगाड घ्यायचं असं राया ठरवतो. पण ज्या लोकांचा नवस पूर्ण होतो त्यांनाच बगाडाचा मान मिळत असतो. या मुद्द्यावर गावकरी त्याला विरोध करतात. पण या विरोधाला न जुमानता तो कौल लावतो आणि यंदाचा बगाड्याचा मान रायभान विधाते याला मिळतो.

3 / 6
याच दरम्यान कृष्णाची जन्मपत्रिका रायला सापडते तो ती गुरुजींना दाखवतो आणि गुरुजी सांगतात की येत्या ७ दिवसांत तिचा मृत्यूयोग आहे. मी कृष्णाचा मृत्यू टाळेन असं राया त्यांना सांगतो आणि तो बगाड्या म्हणून उभा राहतो. रायाची भक्ती कृष्णाचे प्राण वाचवू शकेल का, हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.

4 / 6
बगाड यात्रेच्या विशेष प्रसंगाबद्दल बोलताना राया म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाण म्हणाला, "आम्ही वाईमधील फुलेनगर-शहाबाग येथे हा प्रसंग चित्रित केला. हा प्रसंग चित्रित करणं सोपं नव्हतं, पण या गावातील रहिवाश्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. 'बगाडं'म्हणजे काय आणि त्यासाठी लागणारी मेहनत काय असते? हे सगळं आम्हाला इथल्या स्थानिकांनी सांगितलं. त्यामुळे आम्हाला देखील या परंपरेची ओळख झाली आणि आता प्रेक्षकांना सुद्धा ही बगाड यात्रा पाहायला मिळेल व हे आगामी भाग प्रेक्षकांना खूप आवडतील याची मला खात्री आहे."

5 / 6
मन झालं बाजींद मालिकेत बगाड यात्रा विशेष भाग २५ ते २९ मार्च दरम्यान संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल. या मालिकेत अभिनेता वैभव चव्हाण हा रायाची भूमिका साकारतोय. तर अभिनेत्री श्वेता खरात ही कृष्णाच्या भूमिकेत आहे.

6 / 6
Follow us
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.