Mahesh Bhatt | महेश भट्ट यांनी केले मोठे विधान, माझ्या वडिलांनी आईला कधीच पत्नी म्हणून स्वीकारले नाही, थेट निधनानंतर…
महेश भट्ट हे नुकताच एका शोमध्ये पोहचले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल काही मोठे खुलासे केले आहेत. महेश भट्ट यांचे बोलणे ऐकून आता चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.
1 / 5
महेश भट्ट हे अरबाज खान याच्या शोमध्ये पोहचले. यावेळी महेश भट्ट यांनी त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल खूप मोठे गौप्यस्फोट केले आहेत. इतकेच नाहीतर लहानपणी किती जास्त संघर्ष करावा लागलाय हे देखील सांगताना महेश भट्ट दिसले.
2 / 5
महेश भट्ट म्हणाले की, लहानपणी मला लोक अनैतिक अपत्य म्हणून चिडवायचे. माझी आई मुस्लिम असूनही हिंदू महिलांसारखी राहायची. माझ्या वडिलांनी तिला कधीच एक पत्नी म्हणून स्वीकारले नाही. त्याचे कारणही होते. अगोदरच त्यांचे एक कुटुंब होते.
3 / 5
ज्यावेळी माझ्या आईचे निधन झाले, त्यावेळी ते त्यांच्या पत्नीसोबत आले होते आणि त्यांनी माझ्या आईला कुंकू लावले. हे सर्व पाहून मला खूप मोठा धक्का बसला. कारण त्यांनी कधीच आयुष्यभर माझ्या आईला पत्नी म्हणून स्वीकारले नव्हते.
4 / 5
महेश भट्ट यांनी या शोमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये नेमके लहानपणी काय काय घडले हे सर्वकाही सांगितले आहे. महेश भट्ट म्हणाले, माझे वडिल कधीतरी आमच्या घरी येत होते. जेंव्हा ते आमच्या घरी यायचे त्यावेळी मला कोणीतरी बाहेरचा माणूस आल्यासारखा वाटायचा.
5 / 5