मायरा वैकुळच्या फॅमिलीत नवा मेंबर ॲड, अलिशान कारची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील बालकलाकार मायरा वैकुळच्या घरात नवा फॅमिली मेंबर अॅड झाला आहे. वैकुळ कुटुंबाने नवी कार खरेदी केली आहे.

मायरा वैकुळImage Credit source: मायरा वैकुळ इन्स्टाग्राम
- ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील बालकलाकार मायरा वैकुळच्या घरात नवा फॅमिली मेंबर अॅड झाला आहे. या खास फॅमिली मेंबर सोबतचे फोटो वैकुळ कुटुंबाने शेअर केले आहेत.
- मायराची आई श्वेता वैकुळने इन्स्टाग्राम काही फोटो शेअर केले आहेत. यात त्यांनी नवी कार खरेदी केल्याची माहिती दिली आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत 17 लाखांच्या जवळपास आहे.
- मायरानेही डोळ्याला चष्मा लावून खास पोज देत या नव्या कारसोबत फोटो काढलाय. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केली आहे.
- या फोटोंना श्वेता वैकुळ यांनी “New Car! 1 June 1960… हा नंबर नेहमी आम्हाला खूप कष्ट करण्याचा उत्साह देईल. Miss u papa…” असं कॅप्शन दिलं आहे.
- कार खरेदी केल्यानंतर मायराने तिच्या फॅमिली मेंबर्ससोबत फोटो काढले. हे फोटो श्वेता यांनी इन्स्टाला शेअर केले आहेत.