मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर खालापूर टोलनाक्याजवळील आडोशी येथे तीन ते चार वाजता हा अपघात झाल्याची माहिती आहे. मलायका अरोरा यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर चार टाके पडले आहेत.
अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीचा अपघात खालापूर टोलनाक्याच्याजवळ झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातानंतर मलायका अरोरा हिला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मलायका अरोरा यांच्या गाडीला अपघात झाला त्यामध्ये अपघातग्रस्त झालेली स्विफ्ट गाडी आहे.
मलायका अरोरा यांच्या गाडीला अपघात झाला त्यामध्ये एक प्रवासी वाहतूक करणारी बस आणि स्विफ्ट गाडी देखील अपघातग्रस्त झाली आहे.
मलायका अरोरा यांना अपघातानंतर अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मलायका अरोरा यांचं सिटीस्कॅन करण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं जाणार आहे.