अभिनेत्री रुपाली भोसले हिने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केलेत. यात तिने साडी नेसली आहे. तिचे हे साडीतले फोटो चांगलेच पसंत केले जात आहेत.
रुपाली भोसलेच्या या फोटोंमध्ये तिच्या हातात मोगऱ्याची पुलं दिसत आहेत. याला तिने "मोगरा... माझा आनंद", असं कॅप्शन दिलं आहे.
रुपालीच्या फोटोंना अनेकांची पसंती मिळतेय. साडे सात हजार लोकांनी लाईक केलंय, तर अनेकांनी कमेंट करत यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून ती घराघरात पोहोचली. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
सध्या ती स्टार प्रवाहवरच्या आई कुठे काय करते या मालिकेत काम करतेय. संजना हे तिचं पात्र लोकांच्या पसंतीला उतरतंय.