मराठमोळी अभिनेत्री स्मिता गोंदकर सध्या सोशल मीडियावर आपल्या मराठमोळ्या अंदाजात धुमाकूळ घालतेय. नऊवारी साडीत आता तिनं नवं फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये स्मिता निळ्या रंगाच्या नऊवारी साडीमध्ये दिसतेय, या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
तिचे हे फोटो चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहेत. चाहचे तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये आपली वेगळी छाप पाडल्यानंतर अभिनेत्री स्मिता गोंदकरनं बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा ‘साजणी तू’ या म्युझिक व्हिडीओद्वारे या कमबॅक केलं होतं. या गाण्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.
स्मितानं अनेक भूमिकांच्या माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकली मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती बिग बॉसच्या घरापासून मिळाली.