‘घुमूदे आवाज कानात, वाजू दे डीजे दणक्यात’, ‘का रं देवा’चे पोस्टर आणि म्युझिक लाँच दिमाखात संपन्न!
‘तुझ्यात जीव रंगला’, ‘जय मल्हार’, ‘विठू माऊली’ अशा अनेक मालिका, ‘मुंबई डायरीज’सारख्या वेब सीरीजद्वारे आपला ठसा उमटवेला अभिनेता मयूर लाड ‘का रं देवा’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री मोनालिसा बागल आणि मयूर लाड यांची जोडी या चित्रपटाचं वैशिष्ट्य असून, चित्रपटाचं नुकतंच म्युझिक आणि पोस्टर लाँच सोहळा सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.
Most Read Stories