Madalsa Sharma : मिथुन चक्रवर्तीची सून मदलसा शर्मा सुद्धा झाली कास्टिंग काउचची शिकार, म्हणाली…
अनुपमा या मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री मदलसा शर्मा, ही बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे. मदलसा देखील कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. (Mithun Chakraborty's daughter-in-law Madalsa Sharma also a victim to the casting couch, expressed feelings)
Follow us
टीव्ही सीरियल ‘अनुपमा’ मध्ये नकारात्मक भूमिका साकारणारी काव्या म्हणजेच मदलसा शर्मा, वास्तविक जीवनात कास्टिंग काउचची बळी ठरली आहे आणि तिने स्वतः एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.
कास्टिंग काउच हे बॉलिवूडचे घृणास्पद सत्य आहे. बऱ्याचदा मुली आपले करिअर घडवण्याच्या नादात कास्टिंग काउचच्या जाळ्यात अडकतात. बऱ्याच अभिनेत्रींनी कास्टिंग काउच बाबत आपले अनुभव शेअर केले आहेत. आता अनुपमा या मालिकेत दिसणाऱ्या एका अभिनेत्रीचं नावही या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे.
अनुपमा या मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री मदलसा शर्मा, ही बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे. मदलसा देखील कास्टिंग काउचची शिकार झाली आहे.
मदालसा शर्मा याने कास्टिंग काउचबाबत मोठा खुलासा केला आहे. एका वेब पोर्टलशी बोलताना मदलसा शर्मा म्हणाली, आजच्या युगात मुलगा किंवा मुलगी असणं हे दोन्ही खूप धोकादायक आहेत. तुम्ही कॉर्पोरेट जगात गेलात तर तिथे पुरुषांनी वेढलेली एक मुलगी असते. काही लोक तुमच्यामध्ये स्वारस्य दाखवतात. आपण या वाईट लोकांपासून सहजपणे मुक्त होऊ शकता.
पुढे मदलसा शर्मा म्हणाली, ‘चांगुलपणा आणि वाईटपणा नेहमी सोबतच असतो. आपल्याला काय हवं आहे हे फक्त आपल्यावर अवलंबून आहे. लोक तुम्हाला भडकवू शकतात पण ते तुमचे निर्णय स्वतः बदलू शकत नाहीत. मी सुद्धा अशा घटनांना सामोरे गेले आहे. कधीकधी लोक मला सभांमध्ये अस्वस्थ करतात. अशा लोकांकडे दुर्लक्ष करण्यासाठी मी तिथून निघून जाते.
मदलसा शर्मा पुढे म्हणाली, ‘मला समोर जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, किंवा मला थांबवण्याची कोणाची हिंमत नाही. मी एक अभिनेत्री म्हणून इथे आले आहे. मी माझं काम करते आणि निघते. तुमच्या आयुष्याला कसं सामोरे जायचं ते तुमच्या हातात आहे. कोणीही तुमच्या जीवनाचा ताबा घेऊ शकत नाही.