Marathi Movie : रहस्यमय ‘अलिप्त’ आता प्रदर्शनासाठी सज्ज; थरार अनुभवायला मिळणार?

भूतकाळाच्या खुणा दाखवत वर्तमान काळातील कथा सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागवणारा आहे. दिग्दर्शक मनोज सुधाकर येरूणकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘अलिप्त’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Mysterious 'Alipt' now ready for release; Feel the thrill?)

| Updated on: Oct 08, 2021 | 8:40 AM
चित्रपटाच्या मोठया पडद्यावर प्रेक्षकांना विविध रंग पहायला मिळतात, पण मागील दीड वर्षांच्या काळापासून हे चक्र थांबलं होतं. विविध रंगांचं हे चक्र आता पुन्हा सुरू होणार आहे. बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहेत. यापैकीच एक असलेला रहस्यमय ‘अलिप्त’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

1 / 5
भूतकाळाच्या खुणा दाखवत वर्तमान काळातील कथा सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागवणारा आहे. दिग्दर्शक मनोज सुधाकर येरूणकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘अलिप्त’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

2 / 5
निर्माते अनिकेत विनायक कारंजकर यांनी “कटिंग चाय प्रॉडक्शन’’ या बॅनरखाली ‘अलिप्त’ या चित्रपटाची निर्मिती केली असून “संजू एंटरटेनमेंट’’चे संजय लक्ष्मणराव यादव हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळं देण्याच्या उद्देशानं ‘अलिप्त’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे. स्वप्नील प्रकाश जाधव यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा व संवादलेखन केलं आहे. “भूतकाळातील खुणा वर्तमानात अलिप्त होत नाहीत, तर त्या पुन्हा जन्म घेतात...’’ ही या चित्रपटाची टॅगलाईन बरंच काही सांगणारी आहे. या चित्रपटात वर्तमानाचं भूतकाळाशी असलेलं कनेक्शन पहायला मिळेल. अखेरपर्यंत रहस्य कायम राखणारं कथानक, त्याला साजेसे संवाद, तितकाच तोलामोलाचा अभिनय आणि रहस्य अधिक गडद करणारं संगीत ही या चित्रपटाची प्रमुख बलस्थानं असल्याचं सहनिर्माते संजय लक्ष्मणराव यादव यांचं म्हणणं आहे.

3 / 5
या चित्रपटाचं शीर्षक जरी ‘अलिप्त’ असलं तरी यातील कथा प्रेक्षकांशी एकरूप होऊन त्यांना खिळवून ठेवणारी आहे. आजच्या काळात प्रेक्षकांना केवळ हसवाहसवी करणारं मनोरंजन नको, तर काहीतरी नावीन्यपूर्ण आणि वेगळं देणा-या कलाकृती हव्या असल्याचं मत व्यक्त करत दिग्दर्शक मनोज येरूणकर म्हणाले की, रहस्यपटांचाही एक वेगळा चाहतावर्ग आहे. हा चित्रपट मात्र सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना आकर्षित करणारा आहे. यातील युथ कनेक्शन तरूणाईला, तर भूतकाळातील कनेक्शन इतर वयोगटातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेईल. भूतकाळाचा वर्तमानाशी घातलेला सुरेख मेळ या चित्रपटात पहायला मिळेल.

4 / 5
‘अलिप्त’मध्ये स्वप्नील जाधव, तन्वी हेगडे, शरयू सोनावणे, भूषण घाडी, सुनील देव, सुशांत शेलार आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमॅटोग्राफी अनिकेत कारंजकर यांनी केली आहे. स्वप्नील यांनी जन्मेजय पाटील यांच्या साथीनं लिहिलेल्या गीताला राजेश सावंत यांनी संगीत दिलं आहे. दिलीप मेस्त्री यांनी नृत्यदिग्दर्शन, तर महेंद्र शिव मंगल अप्पा राऊत यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. हर्षद वैती यांनी संकलन केलं असून, ध्वनी अप्पा तारकर यांनी दिला आहे. रंगभूषा अभय मोहिते यांनी केली आहे, तर वेशभूषा प्रतिभा गुरव यांची आहे. लोकेन यांनी पार्श्वसंगीत, फॉली आणि ध्वनी मिश्रण अशी तिहेरी जबाबदारी सांभाळली आहे. एस. नंदागवले या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.